STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

गुढी पाडवा

गुढी पाडवा

1 min
214

शुभारंभ उपक्रम 

पाडवा मुहूर्त बरा 

विजयाचा हा प्रतीक 

करूया सण साजरा 


आनंदाचा क्षण येई 

मांगल्याची गुढी उभी 

स्वच्छ स्नानाने प्रसन्न 

पंचांग श्रवण ऐकी


कडुनिंबाची डहाळी 

सोबत रेशीम साडी 

तांब्यास हार गुंडाळी 

बांधी साखरेची गाढी 


सांगे हे लोकसंस्कृती 

होई भूमी सुफलित 

करूया दान पाण्याचे 

देई समाज संकेत 


सण सुख-समृद्धीचे 

फल हे संवत्सराचे 

अनुकूल-प्रतिकूल 

अंदाज धर्मशास्त्राचे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational