Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nurjahan Shaikh

Inspirational Others

4.0  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

सांगा

सांगा

1 min
188


एकटे असे जीवन, 

सांगा कसे जगायचे ?


छोट्याशा जीवाचे धडधडणे, 

सांगा कसे थांबवायचे ? 


हजारोंच्या नजरा रोखतात, 

सांगा कसे भिडायचे ?


बोट त्यांचे आपल्यावर,

कसे त्यांना सांगायचे ?


त्यांच्या खोचट प्रश्नांवर,

कसे उत्तर द्यायचे ?


असा हा भयानक एकांत, 

कसे एकटे राहायचे ?


विचारांच्या कल्लोळाला,

सांगा कसे आडवायचे ?


दुखी मन आनंदी चेहरा ,

कसे दुनियेला दाखवायचे ?


शब्द ओठावर आल्यावरती, 

सांगा कसे लपवायचे ?


उसळत्या भावनांना ,

सांगा कसे दाबायाचे ?


एकटे एकटे जिवन नको ,

मनाला कसे समजवायचे ?


रडणाऱ्या डोळ्यांचे अश्रू,

सांगा कसे पुसायचे ?


हळूच वाहणाऱ्या मनाला ,

सांगा कसे अडवायचे ?


एवढ्या मोठ्या विश्वात ,

कोणाला बरोबर घ्यायचे ?


मनातल्या भावनांना ,

कोणासमोर उघडायचे ?


नाजुकशा त्या मनाला ,

सांगा कसे फुलवायचे ?


खडतर असे आयुष्य,

सांगा कसे उपभोगायचे ?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational