STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

संत माई

संत माई

1 min
195

बहुगुणी संपन्न अशी ही

कवयित्री संत जनाबाई, 

ममत्वाने बोले गोड शब्द

मुखी श्री विठ्ठल रखुमाई....१


दासी मी तुझी विठू राया 

म्हणे जना नको करू अवहेलना, 

वात्सल्याने भरले माझे मन 

तूच माझ्या विश्वाचा नारायणा....२


आराध्य देवा श्री विठ्ठला 

दंग जना वाजवुनी मृदंग वीणा, 

सोशीक कष्टाने उभी आहे 

कोमल ऋतुजा तुझ्या अंगणा....३


जना ही 'नामयाची दासी' 

उभी विठ्ठलाच्या दारी, 

अभंग गाई भक्तिभावाने 

त्यागाची मूर्ती कल्याणकारी....४ 


गंगाखेड ची संतमाई 

कौतुक कबीराच्या मुखी, 

वाचे जो अभंग जनाचे 

धन्य धन्य मानून होई सुखी....५


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Inspirational