रमजान ईद
रमजान ईद
स्नेह भाव वाढवूनी
आनंद देई मनास,
रमजान ईद येता
भरून येई उत्साहास
महिनाभर पाळून
नमाज, रोजा, जकात,
करूया रोज मनन
कुरान ची तिलावत
चंद्र दर्शन करून
शुक्र अदा अल्लाहचे,
ईद-उल-फित्र करू
साजरी रमजानचे
गरिबांस करुनिया
मदत व दानधर्म,
समाधान होई मन
आनंदाने करूया हे कर्म
रमजानचे महत्व
अवतरले कुरान,
साजरी करूया ईद
जंगे- बदार जिंकून