ऐकशील का?माझ्या मना
ऐकशील का?माझ्या मना
ऐकशील का?
माझ्या कोमल मना
काही समजेना
दुःख
खोलवर रुजतात
वेदनांचे तीक्ष्ण बाण
आठवतात क्षण
नकोसे
एकट्या मनास
सावरते मीच मला
जपून जीवाला
हळुवारपणे
कधी सरतील
दिवस दुःखाचे नकोसे
मन वेडेपिसे
झाले
आठवणी सुखातले
मनास माझ्या सावरते
हृदयास सुखावते
क्षणिक
