STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

एकटं

एकटं

1 min
324

एकट्या रस्त्यातून जाताना

 विचारांच्या वादळात

 गुरफटून जावे

ना स्वतःची, ना जगाची परवा करावी, 

एकट्यानेच प्रवास

 करतच रहावे


आलेल्या अनुभवांना 

जीवनाची शिदोरी समजून

 साठवून ठेवावी

कधी उपयोगी पडलीच 

तर मात्र दुसऱ्यांना देऊन टाकावी


एकट्याच्या प्रवासाने 

अपेक्षा कमी राहतात

दुःख ही आपलेच असते 

आणि सुख ही आपलेच असते


मिळेल ते उपभोगत 

आपण पुढे पुढेच जात असतो 

म्हणूनच एकट्या रस्त्यातून जाताना 

स्वतःच्या विचारात गुंतून

 पुढे पुढे चालतच राहावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational