STORYMIRROR

pankaj

Inspirational

3  

pankaj

Inspirational

आई

आई

1 min
281

९ महिने, ९ दिवसाचा त्रास आणि हदयातून दिलेले रक्त

सारे काही विसरते ती पुत्र प्राप्तीच्या आनंदाने

जवळ होतं सुख सारं पण चित्त मायेने होरपळलेले

गोळा मांसाचा आज अडखडून पडला, सांभाळणारी आई होती

जिद्द तिची, चिकटीही या गोळ्याला घडवत राहती

आशेचा किरण तिचा हा, ति भविष्य यात पाहते

परोपकार ही नको हिला, जग हिचे आसमंतात वसे

जडण-घडण हिची हिलाच धडा शिकवते

आयुष्याच्या खडतर प्रवासात कुठली शक्ती हिस बळ देते

पंकज मधुकर बडगुजर २१/१/१५ रात्रौ ९ वा.

शोधतोय तिचं अस्तित्व, चार घरांच्या भिंतीत

नाही लागत कुठला धागा-दोरा हाती

नक्की कोणामुळे विस्कटलाय ही माती

चुकतोय का मी,

का कोणी चुकीत अडकवलाय

हे समजवून सांगणारा आधारच माझा हरवलाय

सावली शोधतोय तुझी, आई

या भरल्या घरातही

अस्तित्व हरवलंय माझं तुजविन या जगातही.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational