प्रेमाची हवाई छत्री
प्रेमाची हवाई छत्री
प्रेम हलकं करतय तुझं मला,
हळूहळू अलगद तू दिलेल्या वेदनांतुन,
तू दिलेले प्रेम,
सार काही पुसतय हळूहळू डोळ्यांतून..
मी जातोय विश्वात माझ्या
जिथे असतील आठवणी,
फक्त आणि फक्त तुझ्या
ज्यात कसलंही बंधन नसेल.
माझ्या आठवणीतली तू,
माझाच तुझ्यावर अधिकार असेल..
डोळे भरून पाहीन मी तुला,
माझ्याच कुशीत निजवीन,
केसातून तुझ्या अलगद हात फिरवीन.
विश्व मला तेव्हा परकं होईल,
जेव्हा तू माझी असशील
आणि हे जग पोरकं होईल
तुला, मला आणि आपल्या प्रेमाला......
आणि हे जग पोरकं होईल
तुला, मला आणि आपल्या प्रेमाला......
