नवचैतन्याचा पाडवा
नवचैतन्याचा पाडवा
चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी,
शंकर पर्वती विवहची,
साडेतीन मुहूर्तांपैकी ,
वसा घेवू शुभ कार्याची
श्री राम विजयी होवुनी
आयूधायस बातमी आनंदाची
पाडव्याच्या शुभदिनी,
पहाट असे हिंदू नव वर्षाची .
मांगल्य चे प्रतिक ,शलिवाहन
रंगीबेरंगी रांगोळी साथ रंगांची
पुरणपोळी नेव्वेद्यचा थाट
आरोग्य साथ कडुलिंबाच्या पानाची
गुढी बांधून त्यावर तांब्या ,
फुले, माळ साकर गाठीची ,
कडुनिंबाची कोवळी डहाळी ,
शोभे वस्र जरी च्या न्क्षाची
सुखशांती लाभावी,
गुढी पुजा, आदिशक्तीची
भक्तिभावाने आशिर्वाद,
मोहर याला यशाची....
