माझ्या तू जीवनी
माझ्या तू जीवनी
स्वप्नातल्या माझ्या राजकुमारा
रंग भरले तू जीवनी,
चल घेवुन जिथ प्रेम ऋतू
मी तुझी प्रीत साजणी....
स्वप्नात तूच तू राजसा
क्षण माझे लागे थांबू,
सर्वात तुच तू दिसतो
जणू स्वर्ग लागे वाटू....
रेशमी बंधन जुळले आपुले
मनाच्या लहरी कशी आवरु,
हरवत आहे मी तुझ्यात
या प्रहरी कशा सावरु...
सांग ना कशी ही प्रीत
सदा नव्याने वाटते,
सुख दु:खात संगती
माझे मन तुला शोधते...
वाऱ्याने फुले बहरली अवखळ
सुरेल मैफिल स्वरांची सजली,
या दिनी गातो निसर्ग सारा
तारे माळूनी धुंदी नभाची.

