वचन
वचन


तुला दिलेले वचन
शेवटपर्यंत पाळेल
स्वतः जळेल पण
तुझी ज्योत कायमच
मी तेवत ठेवेल.
देशील साथ आयुष्यभराची
तर एकट्यानेच लढेल
प्रत्येक संकटावर मात करून
जिंकण्याचे श्रेय तुझ्याच
पदरात मी टाकेल.
ओळख ही फार जुनी
स्वप्नांच्या आठवणीत
गुंग होऊन जपेल
स्मित हास्य तुझ्या
चेहर्यावरील कष्टाच्या भाकरीवाणी
रोजच नव्याने मी कमवेल.
क्षण हे सोबतीचे नाजूक
अक्षरांनी मनावर तुझ्या
उमटवेल
डोळ्याच्या किनार्यावर उभी
तुझी प्रतिमा सप्त रंगानी
मी रंगवेल.