पाठवणी
पाठवणी




डोळ्यातील काजळाला भुरळ पडली
अश्रूंच्या वघळाने पापणी मिटली
भावनेची कळा हुंदक्यात संपली
परक्याचे धन मिठीत सावरली
इतकी मोठी कधी तू झाली
निरोपाची वेळ जवळ आली
अंगा खांद्यावर खेळणारी बाहुली
माहेर सोडून सासरी निघाली
एका क्षणात परिस्थिती बदलली
ओल्या रुमालाची घडी विस्कटली
जुन्या आठवणींची उजळणी झाली
नव नात्याच्या प्रवासात तू गुंतली
आई-बापाच्या जिवाची घालमेल झाली
कन्यादानाच्या हातांनी कर्तव्ये निभावली
लग्नगाठ बांधून लाडक्या लेकीची
अख्ख्या आयुष्याची पुण्याई कमावली