कॉलेज कट्टा
कॉलेज कट्टा

1 min

580
थट्टा मस्करीचा एकच अड्डा
कॉलेज आणि काॅन्टीनचा कट्टा
जीवाभावाच्या मैत्रीवर लावतो सट्टा
गल्ली बोळातील प्रत्येक पोट्टा.
वडापाव मिसळचा गरम किस्सा
सळसळत्या रक्ताचा वाढवतो गुस्सा
उधारीच्या पैशाचा पिऊन रस्सा
फुगतो पोटाचा टुमदार हिस्सा.
दिल दोस्ती दुनियादारीचा मस्का
ऐटीकेटीचा हा पक्का नुस्का
अपमानाचा असतो माथी शिक्का
घरच्याचा घेत नाही तरीही धस्का.
आपल्याच धुंदीत जगतो पढ्ढा
वेशीवर टांगूनी भविष्याचा पट्टा
प्रत्येकच निर्णय घेतो पक्का
असा घडवतो मनाला कट्टा.