पायपीट
पायपीट
समद्यांना पडला एकच प्रश्न
कधी सुकर होईल जिणं
हातावरल्या पोटाचं चालू आहे
रोजच चाल ढकल करणं
स्वप्नांचं फुलवलं होतं रान
दुःखाला नव्हतं कोणतंच ठिकाण
अकस्मात परिस्थितीनं केलं बेभान
खोटं ठरलं जीवनाचं ज्ञान
मैल न् मैल पायपिटीनं
देहाचं झालं होतं मेणं
संपवून सारं देणं-घेणं
निघालो आम्ही गावाच्या दिशेनं
घामावर बसली धुळीची घाण
घशाला लागली पाण्याची आण
कष्टाच्या भाकरीनं आटला प्राण
मालवली ज्योत संपली शान