रूप रणरागिणीचे
रूप रणरागिणीचे

1 min

344
स्वातंत्र्याची मशाल पेटवूनी
मातृभूमीची ओटी भरते
एकात्मतेची व्रजमूठ करूनी
परकीयांची पायेमुळे छाटते.
खांद्याला खांदा लावून
देशाची बेटीही लढते
वीरगतीची माळा टांगूनी
शौर्याची गाथा सांगते.
ध्यासाला ईश्वर मानूनी
असंख्य माथे झुकवते
मातीच्या सुगंधात न्हावूनी
विजयी रणशिंग फुंकते.
पिळवणूकीच्या साखळ्या तोडूनी
क्रांतीची ठिणगी भडकते
जात-पात, धर्म-पंथ सोडूनी
अंतर मनांचे मिटते.