जगावेगळं नात बहिण भावाचं
जगावेगळं नात बहिण भावाचं

1 min

72
घट्ट बांधूनी नाते जीवाचे
वचन मिळवले तू रक्षणाचे
देउनी आशिर्वाद कायम सुखाचे
सुखावले क्षण आनंदाने जिव्हाळ्याचे.
त्यागूनी स्वप्ने वेळोवेळी स्वतःचे
मार्ग दाखविले तूच शिक्षणाचे
धडे दिले अनुभवातून संस्कारांचे
बळकट केले मनगट आत्मविश्वासाचे.
समजुतीने घेतले निर्णय आयुष्याचे
प्रसंग सोडवले तू पेचाचे
कौतुक मला तुझ्या सहनशक्तीचे
ध्यैयवेड्या मनाचे अन् देहाचे.
कळाले नव्हते बंध स्नेहाचे
अश्रूंना पोरक्या करणार्या सणाचे
मनाशी हितगुज साधणाऱ्या शब्दांचे
भावनारुपी मिठीतल्या ऋणानुबंधाचे