स्वतःला तू थांबवू नकोस...
स्वतःला तू थांबवू नकोस...

1 min

437
स्वतःला तू थांबवू नकोस
मागे वळून पाहू नकोस
भूतकाळाच्या डोहात बुडून
भविष्याला दोष देऊ नकोस.
विश्वास डगमगू देऊ नकोस
धेय्याशी काडीमोड घेऊ नकोस
उंच भरारी घेण्यास सदा
पंख ज्ञानाचे डावलू नकोस.
स्वतःशी हरून जाऊ नकोस
आस यशाची सोडू नकोस
तुच तुझा भाग्य विधाता
हे विसरून जाऊ नकोस.
संघर्षाला नाही म्हणू नकोस
कर्तव्याआड भावनेला आणू नकोस
अनमोल असे हे जीवन
व्यर्थ वाया घालवू नकोस.