जागतिकीकरण
जागतिकीकरण
1 min
270
वर्क फ्रॉम होमला येत नसते
सर मेहनतीच्या कामाची
हीच तर शोकांतिका असते
त्यांच्या जीवन जगण्याची.
गुगलच्या भरवश्यावर बसत नसते
घडी ही नशिबाची
प्रत्यक्ष अनुभवातूनच भागत असते
भूक रिकाम्या पोटाची.
मोबाईलच्या व्हर्चुअल खेळात नसते
हालचाल शरीराची
मैदानी खेळात लागत असते
कसोटी ताकदीची.
कॉम्प्युटरची भाषाच ही असते
बडबड तात्पुरतीची
मेंदूच्या कानाकोपऱ्यात कायम राहते
तळमळ बुद्धीची.
