स्वाभिमान
स्वाभिमान
स्वाभिमानाचा गळा आवळतो
मान-सन्मानाचा क्षणीक फास
विचारांना शुष्क करतो
संशयाचा तुच्छ घास
ठिणगी प्रतिशोधाची पेटवतो
अपमानाचा दीर्घ श्वास
निःस्वार्थी भावनांना छळतो
तात्पुरत्या पदाचा अट्टाहास
घाणेरड्या शब्दांमुळे होतो
पवित्र वाणीचा ऱ्हास
खोटारड्या वावाहीला हवा
दरवेळी मनाचा सहवास
शांत स्वभावाला गुंडाळतो
क्रूर प्रवृत्तीचा ध्यास
प्रगतीच्या सुवासाला नडतो
अधोगतीच्या दुर्गंधीचा वास