Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

UMA PATIL

Tragedy

4  

UMA PATIL

Tragedy

फास

फास

1 min
12.9K


जन्माचे फेरे आम्हांला

कधीही नाही चुकले

अवकाळी पाऊस आला

नशीब आमचे सुकले


शेतात जरी माझी

सोलवटली चामडी

तरीही मिळत नाही

मनाजोगती दमडी


माझे बैल आहेत

जीवा आणि शीवा

जीव की प्राण माझे

वाटतो त्यांचा हेवा


पारंपरिक शेतीवर मी

दरवर्षी पिके काढतो

या तुटपुंज्या दामावर

कुटुंब माझे पोसतो


विपरीत घडले असे हे

निसर्ग असा वागला वक्र

आता सांगा कसे सांभाळावे ?

पावसाचे अनियमित चक्र


अवकाळी पाऊस आला

गारांचा जोरदार मारा

उभी पिके उद्ध्वस्त

गुरांना ना उरला चारा


पिकांचे नुकसान झालेले

भरून कसे निघावे ?

चुलीवरती भाकर नाही

जीवन कसे काढावे ?


सरकार दरबारी शेतकऱ्याला

नाही काहीच किंमत

हळूहळू खचत चालली

माझ्या जगण्याची हिंमत


शेतकरी मरतो रोजच

किटकनाशके पिऊन

जातो शेतकरी निघून

कुटुंबाला चटका लावून


झाडावर जीव द्यायला

निघालो दूर कोसावर

होते, नव्हते बळ गेले

मी लटकलो फासावर


Rate this content
Log in