STORYMIRROR

Pandit Warade

Others Tragedy

4  

Pandit Warade

Others Tragedy

आजार होता

आजार होता

1 min
28.7K



(सागर राजे सरांनी दिलेल्या ओळीवर)


भेटला मजला फुलांचा हार होता ।

वाटला तेव्हा मला सत्कार होता ।।


वाहिले नाही जराही रक्त जेव्हा ।

मानले तो आपल्यांचा वार होता ।।


राहिला नाही भरोसा पावसाचा ।

जो बळीच्या जीवना आधार होता ।।


स्थापला मठ, घातला पोशाख न्यारा ।

चालला तेथेच स्वैराचार होता ।।


आपला समजून हाती हात देता ।

तो निघाला गाढवांचा यार होता ।।


यार माझ्या जीवनाच्या सांजवेळी।

जाहला माझा मुलांना भार होता ।।


संपला माझ्या बरोबर 'मी' पणाही।

जीवनाचा जो महा आजार होता ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन