तुला आठवतंय ना !
तुला आठवतंय ना !


तुला आठवतंय ना आमच्या लहानपणी
तू गात होतीस सुंदर गाणी
तुझा आवाज होता कोकिळावाणी
तृप्त व्हायचं जेव्हा तुझे गाणे पडे माझ्या कानी
आम्ही आम्ही खेळायचो ना खेळ भातुकलीचा
ज्यात एक राणी आणि एक राजा असायचा
नेहमी मी राजा आणि तू राणी व्हायचीस
मग मग तू त्यादिवसापुरत माझा सांभाळ करायचीय
आम्ही आम्ही दोघे एकत्र शाळेला जायचो
दोघांनी डबा आणल्यावरच आम्ही जेवण करायचो
गृहपाठ नाही केला म्हणून आम्ही एकत्रच मार खायचो
शाळा सुटल्यावर तुझ्याबरोबरच मी बाहेर पडायचो
दररविवारी संध्याकाळी फिरायला जायचं
रिमझिम पावसात एकत्र भिजायचं
आम्हाला आईवडिलांच बंधन कधीच नसायचं
वाटे तुझ्यासोबत च संपुर्ण आयुष्य घालवायचं
दहावीनंतर शिक्षणासाठी आलो मी शहरात
अजुन माझी जागा असेल का तुझ्या मनात
क्षणोक्षणी येत असते मला तुझी आठवण
म्हणून लहानपणीच्या सर्व आठवणींचे केले आहे मी साठवण