मन झाले तुझे
मन झाले तुझे
अंतरी नांदते
तुझ्यात मी लुप्त,
मन झाले तुझे
प्रित रंगी गुप्त...
सप्तजन्म तुझी
राधा मीच असे,
तव स्पर्श भास
स्वप्नी सौख्य दिसे..
आसुसले मन
तुझे असे झाले,
वेदनांचे व्रण
सहज हसले...
विसरले गावं
दुखऱ्या वाटेचा,
एकरूप बंध
सुखद श्वासाचा...
साथ तुझी हवी
साऱ्या जीवनात,
नकोच दुरावा
कमी न कशात...
तुझ्याविना प्रिया
क्षणही बोचरे,
आघातांचे मन
होऊनी बावरे...
किती मी सोसले
घाव काळजात,
मन झाले तुझे
सौख्य लहरीत...