STORYMIRROR

Chandrakant Pawar

Romance

3  

Chandrakant Pawar

Romance

कविता.प्रियकर सध्या काय करतोय

कविता.प्रियकर सध्या काय करतोय

1 min
177

तुझी मला अरे खुप आठवण येते

तू मला नक्कीच विसरला असशील असे वाटते

अजूनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतोय...?

तुला माझी आठवण येत असेल काय

नक्कीच येत असेल,असा भास मला होय

अजूनही वाटतेय , प्रियकर सध्या काय करतोय...?

माझे डोळे खूपच बोलके आहेत असं

 तूच मला एका क्षणी सांगितलं होतसं

अजूनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतोय...?

मला तुझे सुंदर केस खूप आवडत

परंतु माझ्या केसात नकळत तुझीच बोटे फिरत

अजूनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतोय...?

ब्रेकअप नंतर ब्रेकअप झाले असे सर्वांना सांगतोस

अन् माझ्याकडे जराही पाहत नाहीस असे कां वागतोस

अजूनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतोय...?

मला अजूनही तू पूर्वीसारखाच वाटतोस

पण तू माझ्याशी बोलत नाहीस, मला दूर लोटतोस

अजूनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतोय...?

आजही माझे पूर्वीइतकेच प्रेम आहे तुझ्यावर

तेवढा तरी विश्वास आहे ना तुझा माझ्यावर

अजूनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतो...?

फक्त तू मला आता एकदा तरी दिसायला हवास

माझं तुझ्यावर वाढलेले प्रेम तू पहायला हवास

अजुनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतोय...?

माझी आतुरता तू समजून घे

एकदा तरी तू मला भेटायला ये

अजूनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतोय...?

अजूनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतोय...?

अजूनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतोय...?

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance