STORYMIRROR

Chandrakant Pawar

Horror

3  

Chandrakant Pawar

Horror

सावली कविता. 3

सावली कविता. 3

1 min
165

गच्च अंधारात सावली राहाते

 दबा धरून...

तिथे अचानक समोरून...

प्रकटते पाठीमागून...

उभी राहते थोडक्यात एकदम येऊन

मागे वळते एखादा भूत समजून..


सावली अंधारात सोडते साथ-संगत

बघणारे भयंकर दचकतात

चालणारे जागीच थबकतात


सावली प्रकाशात गोठते

सावली अंधारात गायब होते

सावली एकदम काळीकुट्ट

सावली दुसर दुसर फट्ट 


सावली चालताना सोबत राहते

थांबताना गचकन थांबते...

काळजाचा ठोका चुकवित

 उभी राहते शेजारी...

सावलीला भिणारे भयंकर भितात

सावलीची साथ संग सुटावी म्हणून सैराटतात


अक्षरश: धूम ठोकीत पळतात

सावली प्रेम छायेसाठी प्रकाशाशी नाते जोडते

प्रकाशाच्या किरणासाठी तिकडेच जाते

प्रकाश शिवाय सावली नसते...


सावली प्रकाशाची प्रखर बाहुली

सावली उजेडाची प्रति माऊली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror