STORYMIRROR

Chandrakant Pawar

Others

2  

Chandrakant Pawar

Others

सावली ३

सावली ३

1 min
35

गच्च अंधारात सावली राहते

दबा धरून

तिथे अचानक समोरून

दचकवते पाठीमागून

उभी राहते पुढ्यात एकदम प्रगट होऊन

मागे वळते एखादं भुत समजून

सावली अंधारात सोडते साथ-संगत


बघणारे दचकतात

चालणारे थबकतात

 सावली प्रकाशात गोठते

 सावली अंधारात लुप्त होते

सावली एकदम काळीकुट्ट

सावली धूसर धूसर फट्ट


सावली चालताना सोबत राहते

थांबताना गचकन थांबते

 काळजाचा ठोका चुकवित येते शेजारी

सावलीला भिणारे भयंकर भितात

 तिची साथ संगत सुटावी म्हणून सैराटतात


सावली प्रेम छायेसाठी प्रकाशाशी नाते जोडते

 प्रकाशाच्या किरणासाठी तिकडेच धाव घेते

 सावली प्रकाशाची प्रखर बाहुली

सावली उजेडाची प्रति माऊली


Rate this content
Log in