STORYMIRROR

Chandrakant Pawar

Romance Tragedy

3  

Chandrakant Pawar

Romance Tragedy

सावली १

सावली १

1 min
216

तू जिथे असशील ना...

तिथे असेल माझी सावली.

या जगात नसेन मी जरी...

माझी सावली राहील मागे

बनून प्रकाश बाहुली...


सावली पडछायेसाठी हवा उजेड

 तीव्र सूर्यप्रकाश... नाही तर चंद्रकिरणे

एका क्षणाचा तुझ्या प्रेमाचा प्रकाश

 पुरेल माझ्या सावलीसाठी...


एक दिवस माझी सावली तुझी होईल

नंतर तूच तिला म्हणशील....

 अशी माझ्या मागे मागे राहू नकोस

 आता काळोख पडला आहे.

 घरात प्रवेश कर.

 

घरात प्रवेश केल्यावर सांगशील

सावले...

आता मनात शीर

असं तूच म्हणशील तिला...


तुझ्या सावलीला तू दुरावशील ना..

 तेव्हाही माझी सावली तिथेच असेल

 तुझ्या पाठीशी... सावलीसारखी...

तुला धीर देण्यासाठी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance