STORYMIRROR

Chandrakant Pawar

Horror

3  

Chandrakant Pawar

Horror

सावली कविता... २

सावली कविता... २

1 min
349

सावलीलाही ठाऊक असतात प्रकाश वाटा

सावलीलाही असते प्रकाशाची ओढ

सावलीला ही असते उपछाया...

खरं नाही ना वाटत...

तर चंद्राला विचारा...


चंद्र अवश्य सांगेल प्रकाशाची व्यथा

सूर्याकडे असतो प्रकाश किरणांचा प्रखर जथ्था

चंद्र परावलंबी प्रमाणे शोषून घेतो प्रकाशलहरी

सोडतो अंधारात शितल प्रकाश लाटा


अंधारा मुळेच शीतलता वाढते...

यासाठी चंद्र सावलीत वाढतो

सावलीच्या कलेकलेने मोठा होतो

सावलीच्या ऱ्हासाने लहान बनतो...


स्वतःच्या सावलीचे चौर्यकर्म

करण्याची हिंमत फक्त सावलीतच आढळते

सावलीला हवी असते उजेडाची साथ

सावलीलाही हवे असते.

प्रकाशाचे निर्मळ प्रेम...


सावलीतच प्रेम भरते

प्रेमाने सावली मुसमुसते...


प्रेमामुळे सावली सावलीसारखी

 स्वतःच्या पाठीशी रहाते

उभी आकृती पाठमोरी

नखशिकांत हादरवते खरी...


काहीवेळा सावली भयप्रद भासते

काहीवेळा सावली स्वतःची साथ करते

काहीवेळा सावली सोडून जाते दूर

कुणीकुणी मात्र सावलीलाच भिजवतात...


अनेकजण सावलीच्या चातुर्याने प्रकाशतात

बहुतेकजण स्वतःच्या सावलीला भितात

तिला प्रेमाने जवळ घेणारे आकर्षणतात


सावली कुणाचीही पडछाया असते

सावली उन्हाची आभाळमाया बनते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror