प्रेत ते जणू बोलत होतं
प्रेत ते जणू बोलत होतं
एक दिवस समश्यान भूमितून जाताना
कळत नकळ नजर माझी प्रेताकडे गेली
असं वाटलं जणू जळता जळता त्याने
हसत हसत मान माझ्याकडे केली
भास असा मला जाणऊ लागला होता
शरनावरचा व्यक्ती जणू मला खूनवू लागला होता
पाहून मला वाटलं जणू त्याला
मला काही सांगायचं आहे
काय पाहतोय असं मला तू
एक दिवस तुलाही इथंच यायचे आहे
दचकलो मी एकाएकी भयंकर भितने
जीव पाहून थरथरू लागला होता
सरणावरचा तो प्रेत जणू हसत हसत
पाहून माझ्याकडे जळू ल
ागला होता
भास झाला मला अजून काही
तो मला काहीतरी सांगणार आहे
काय पाहतोस मला असं तू
एक दिवस तू ही मरणार आहेस
पाहू वाटत नव्हतं आता ते चित्र
सांगू लागला जणू तो असा विचित्र
एक दिवस तुही मरणार
धडा धड अग्नीच्या ज्वालात जळणार
राख होऊन मातीत मिसळणार
वाऱ्याच्या झूळकीत धुळ होऊन उडणार
जणू बोलून असं मला तो
माती होऊन मातीत मिसळला होता
गर्व मी पण अन माज यांचा बुरुज
माझा तिथंच डासळा होता