आरोप
आरोप


थकलो रे आज देवा
हरलो मी आयुष्यात
सुखी होतो एक वेळ
क्षणाचा तो झाला घात
होरपळला जीव इथे
पेटलेल्या वनव्याने
कलियुग आलं देवा
उपकाराची फेड आरोपाने
नको देवा नको आता
नको मोह अन माया
नको मज काही आता
दे फक्त तुझी छत्रछाया
फाटलेल्या हृदयातून
जपू किती हळवपण
पाह्य देवा दुःख माझं
उदास हे नेहमी मन