बालपण
बालपण
1 min
199
आवडतंय मला आजून ही
लहान लेकरू होऊन जगायला,
कामाचा न घेता कसलाही लोड
मनोसूक्त आनंदात खेळायला.
आनंददायक सुखांन भरलेल
बालपण खूपच छान असतं,
स्वप्नं ऊद्याचे नसतात मनी
क्षणा क्षणाला दुःख त्यात नसतं.
असतात खूपच छान दिवस ते
बालपणी लाड करतात सर्वजण,
आई बाबा ताई भाऊ आजी आजोबा
त्यांच्या स्नेहाने, लाडाने येते फुलून मन .
बालपणीच्या आयुष्यात अता
पुन्हां पुन्हां जावंसं वाटतंय ,
आठवणी ने बालपणीच्या
मनात माझ्या काहूर हे सुटतय .
