STORYMIRROR

angad darade

Others

3  

angad darade

Others

जाईल प्राण हा निघून

जाईल प्राण हा निघून

1 min
210

जाईल प्राण हा निघून

एक दिवस या हुंदक्यानी


जातो निघून वेळीच आता 

कुठेतरी अशा ठिकाणी

नसणार तिथे कोणी माझे

दुनिया जणू ती परक्यावाणी


रडू नको कधीच मजसाठी

थकललेल्या त्या लोचनानी

जातो निघून वेळीच आता

अशा मी तुझ्या आयुष्यातुनी 


फुंदू फुंदू रडणं हे माझं

एकूण ही केलं न ऐकल्यावाणी

चुक माझीच नेहमीच सांगत 

टाकलं मज एकटच अनवाणी


भिजला देह माझा सदा

आठवनीच्या आसवाणी

जाईल प्राण हा निघून

एक दिवस या हुंदक्यानी 


दिसणार ना कधीच आता

सोधू नकोस मज नयनांणी

न ऐकली हाक माझी वेळी 

दिलती तुज जी माझ्या सुरांनी 


जातो निघून आता कर माफ

चुकलो मी माझ्या चुकांनी 

सुखी राहो सदा तू हेच सांगतो 

नको आणू कधी डोळ्यात पाणी 


Rate this content
Log in