STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Horror Fantasy

3  

अमोल धों सुर्यवंशी

Horror Fantasy

कंडार

कंडार

1 min
264

कंडार डोंगरवार रात्री कडकडाट उठला

गावकऱ्यांनी चावडीवर कलोह उडवला

गावभर साऱ्या दवंडी पेटवूनी

कळकीच्या बणात भुतांची घुमर घुमली...


सांग्या वागीन दुर्घटना घडली 

भुताची स्वारी गावकडे वळली

माशालीने गाव पेटून उटला

पाटलांच्या घराकडे धावत सुटला.......


दसर्‍याच्या सनाला देव गेलेत शिकारीला

वेशीवरील खविस परडीने भागेना

राखन करता लबाड झाला

पिंपळा खालील मारूती चोरीला गेलाय


आडावरच्या जकनीन सुमनिला धरलय

तीझ्यासाठी उपारट तलंग नाय सोडलय

या वक्ताला मोठा घात पात होणार 

भुतांचा गावत शबिना येणार

गावकऱ्यांचे हालहाल होणार

भूत पिशाच्य कोल्हा कूत्रासारखे लचके तोडणार!!!!


पाटलान मिशीला पिळीत ईशारा दिला

गावकर्‍यांचा हिवाळ्यात घाम फुटला 

पुजाराने कवल घेवून आरडा ओरडा केला

जमीन थोपटवत बोलू लागला...


देवीचा कोप झाला शापित झाला गाव सारा 

मागल्या वर्षीला बळी नाय दिला

यंदा भुतांचा सुटलाय भवंडर वाऱा

लाटला जाईल त्याखाली गाव सारा 


गावत झाली पळापळ सारे पळाले नदीवर 

पांड्या नाहवी राहीला दुकानवर कोटर मारून झोपलाय टर

जंगलात आवाज थरारला पांड्या भयंकर ओरडला

गावसारा चोरांनी चोरून न्हेला एक प्याक मारू डूलकून पडला


सकाळ प्रहारी लोकांनी घराकडे पळ घेतला

बघताच हा प्रकार दचकून गेले लाकडचोरांनी गलीमा केला

सारा कंडार डोंगर वाडसून नेहेला

आध्दंश्रदे पायी लोकांना आदल घडेना

पुन्हा त्या गावी भुतांचा जन्मच का? होईना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Horror