STORYMIRROR

Chandrakant Pawar

Others

2  

Chandrakant Pawar

Others

कवी असतो माणूस...

कवी असतो माणूस...

1 min
56

जेव्हा माणूस माणसाचा शत्रू बनतो.

 तेव्हा माणूस कवी नसतो

 मानवांच्या निर्दयी

 कत्तली होतात निसर्गाच्या ही

 तेव्हा कवी माणूस नसतो...


पशुपक्षी बागडतात अरण्यात

जगतात मुक्तपणे वेलीवृक्ष फळेतृणे

बहरतात नैसर्गिकपणे

तेव्हा माणूस कवी माणूस होतो.


खोट्या चेहऱ्या आड लपलेला चेहरा

 खऱ्या माणसाचा नसतो

तेव्हाही तो कविचाही सुद्धा नसतो

माणुसकीचा तर नसतोच नसतो


कथाकविता त्याच्याशी फटकून वागते

अशावेळी...

कवी माणूस नसतो.

कवी ठरतो अमानूष...


माणूस माणूसपणा विसरतो

कवी कविपणा नाकारतो

अशावेळी कवी...

कवी नसतो..


कवी विचार सांगतो ...

मांडतो तत्त्वज्ञान शब्दांचे

मार्मिकपणे लेखणीने विषय चिंतन करतो

लेखणीच्या फटकाऱ्याने आशय छिन्न करतो


शब्दांचे आसूड उगारतो

तेव्हा कवी माणूस ठरतो

तेव्हा माणूस...

कवी म्हणून जन्मतो

तेव्हा माणूस असतो कवी...


Rate this content
Log in