STORYMIRROR

Chandrakant Pawar

Romance

3  

Chandrakant Pawar

Romance

कविता. भेट

कविता. भेट

1 min
194

गाडी थंड हवा

 बाहेर झुळुक वारा

तुला पेंग आली की ग्लानी

अलगद खांद्यावर रेललीस

 प्रथमच बोललीस

सॉरी हं...


तिथेच पटलीस

एकदम हसलीस

 हलकेच म्हणालीस

ते झोपेचे नाटक खोटे


अग ...मग खरं काय ते बोल ना...?

ओहो ...ओ...हो...ओहोहो...

झकास लाजली

हलकेच पुटपुलीस


सगळेच सांगायलाच हवंय...

ओळखता येत नाही मनातलं


निरोपाच्या वेळी आग्रह भारी

इथेच उतर इथंच उतर या स्टॉपला

 उत्तर ऐकून हिरमुसलीस

 नाही जमणार महत्त्वाच्या कामासाठी आहे प्रवास

 

पुन्हा भेटू लवकरच

आश्वासनावर नाराजलीस


मनात विचार चक्र सुरू भयंकर

कोण ग तू... कुठची ग तू...

स्मार्टफोन कायम बंद तुझा

तेव्हा पासून शोध सुरू आहे माझा


पत्ता माहीत नसलेल्या अपूर्ण प्रेमाचा

शोध एका प्रिय प्रिय बेपत्ता प्रियतमेचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance