STORYMIRROR

Chandrakant Pawar

Romance

3  

Chandrakant Pawar

Romance

कविता-प्रेयसी सध्या काय करतेय

कविता-प्रेयसी सध्या काय करतेय

1 min
163

बालपणी भातुकलीच्या खेळात

आवडीने नवरी व्हायचीस

 मीच नवरा हवा यासाठी हट्ट धरायचीस

मनात प्रश्न येतो, प्रेयसी सध्या काय करतेय...?

तू आता कुठे असशील...?

मी ही आता कुठेतरी आहे..

तू असशील कुणाचं तरी संसार फुलवीत..

मनात प्रश्न येतो, प्रेयसी सध्या काय करतेय...?

मी सुद्धा अडकलो आहे

 स्वतःच्या संसारात...

 खरंच तू आता कुठे आहेस.?

मनात प्रश्न येतो, प्रेयसी सध्या काय करतेय...?

मी नाही दिसलो, तर तू रडायचीस

 मी नाही बोललो,तर तू नाराजायचीस

मनात प्रश्न येतो, प्रेयसी सध्या काय करतेय...?

तू नाही भेटलीस तर राणी

 वेडापिसा होऊन मी गायचो तुझी गाणी

मनात तो प्रश्न येतो, प्रेयसी सध्या काय करतेय...?

हे काय घडलेय... माझं तुझ्यावर प्रेम जडलेय...

तू कुठे...

मी कुठे ...

तू तिथे...

मी इथे...

मनात प्रश्न येतो,प्रेयसी सध्या काय करतेय...?

मनात प्रश्न येतो,प्रेयसी सध्या काय करतेय...?

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance