भयाण रात्र
भयाण रात्र
भयाण अशी ही रात्र
अन विजेचा लपंडाव सुरू,
मन नाही थाऱ्यावर
मग मी तरी काय करू
धीर किती हा देवू
अशा या भेदरलेल्या देहाला,
आवर किती हा घालू
अशा या अस्थिरलेल्या मनाला
अशा या अंधाऱ्या रात्री
येता आठवण घेतो रडून,
कोणाची नजर पडू नये
म्हणून बसतो मी दडून
रडणे म्हणजे काय
भ्याड पणा नव्हे,
मनाला मोकळे करण्यासाठी
हेच तर साधन हवे
पण जग असते कसे
जशी जात महांडुळाची,
दुसऱ्याची मने पोखरण्याची
रीत तशी ती गांडूळाची

