STORYMIRROR

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Romance

3  

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Romance

मोहरला क्षण

मोहरला क्षण

1 min
315

मोहरला क्षण सारा 

सख्या तुझ्या भेटीत

तृप्त झाले मन माझे

सख्या तुझ्या मिठीत 


तना-मनावर चढली

आनंदाची नशा

प्रेमाच्या सुरांनी

गजबजल्या दाही दिशा


तुझ्या मिठीत मज

वाटे निरव शांतता

कधीच ना सरावी

सख्या ही एकांतता


थांबवावा हा क्षण

वाटे पुन्हा पुन्हा 

वेड्या मनाने केला 

प्रेमाचा रे गुन्हा


तुझ्या मिठीत येई 

अंगावरी शहारा

तुझ्या प्रेमात भिजला

हा देह सारा


गोडवा तुझ्या सोबतीचा 

हवा हवासा वाटतो

हा सोबतीचा क्षण

का क्षणार्धात संपतो 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance