STORYMIRROR

पद्मवैखरी ठाकरे

Romance Others

3  

पद्मवैखरी ठाकरे

Romance Others

रंग माझे तुझ्यातले...

रंग माझे तुझ्यातले...

1 min
286

हलकेच नभीचे

एक मोहक क्षणाचे

आज सर्व पसरतील

रंग हे कसे प्रेमाचे


ना माझ्यातील ते

ना होईल तुझ्यात ही

आपल्यातूनच रंगतील

रंग मग हे दोघांचे


एक रंग तुझ्या प्रेमाचा तर 

दुसऱ्या माझ्या रुसव्याचे

मिळुनी ते गडद होती 

रंग हे आपल्या नात्याचे


कसे हलकेच चढती रंग

जणू हरवण्या आसमंत

ओंजळीतल्या गुलालात

रंग उधळती मग स्वप्नांचे


किती किमया ही वसूची

दाटी रक्तवर्णी सभोवती

या शिशिरात ही भासवी

मज रंग तुझ्याच भेटीचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance