तुला हारतांना...
तुला हारतांना...
तुझ्या प्रेमाच्या बंधनात
गुदमरतेय मीच आता
श्वासही एकटे झाले
तुला रोज समजाविता
मनावरचे घाव शब्दाचे
ओठीच विरले ते आता
खोट्या तुझ्या शब्दाला
नाही मी भुलणार आता
प्रेम तुझे, वेळ ही तुझी,
मर्जी तुझी अन् मीही
या लपंडावात होणार
हार फक्त माझीच ही
पण तरीही तुझ्या या
खेळास संपवेल मी आता
खोट्या तुझ्या शब्दाला
नाही मी भुलणार आता
रोजची नवे ते बहाने हे
रोजचेच सोसणे झाले
तुझ्या या वागण्याचे खोटे
दाखले फक्त मग राहिले
तुझ्या प्रत्येक वळणावर
नाही वळणार मी आता
खोट्या तुझ्या शब्दाला
नाही मी भुलणार आता
किती आणखी मि या
कोंडीत राहू सांग मला
आस या प्रेमाची मग
येईल कधी रे तुला?
काटेरी या क्षणाची मीच
सोबती मलाच आता
खोट्या तुझ्या शब्दाला
नाही मी भुलणार आता
ती शिक्षा रुसव्याची अन्
परीक्षाही झाली दुराव्याची
तुझ्या विना अपेक्षाच
नाही करवत राहण्याची
दोन्ही सोडविताना मीच
हरले त्यातही अशी आता
खोट्या तुझ्या शब्दाला
नाही मी भुलणार आता

