उसळलेला दर्या
उसळलेला दर्या
1 min
199
विषय निसर्ग
काव्यप्रकार अष्टाक्षरी
गर्द हिरवाई दाटे
खुले निसर्ग सागरी
उसळती लाटा वेगे
भेटी अधीर अंबरी (1)
ताड माड उंच वाढे
डुले नारळ, पोफळी
काजू, सुपारी डौलात
शोभा आगळीवेगळी (2)
भरतीची मजा न्यारी
लाटा वेगे उसळती
सुख दाटे गळाभेटी
चिंब नवथर प्रीती (3)
बोट सागर कुशीत
येती प्रेमिक खुशीत
कुजबुज गे मिठीत
गोड तुषार शिंपीत (4)
उंच स्वैर विहरावे
निळाईला निरखावे
येता अंबर कवेत
मन तृप्तीत न्हावे (5)
रविबिंब क्षितीजाशी
रत्नाकर आरक्तसा
मीलनासी अधिरसा
धुंद होय मदीरसा (6)