मी, तू आणि पाऊस
मी, तू आणि पाऊस
तू असा अचानक
धो धो बरसतोस की..
खरंच मला काही सुचत नाही
तुझ्यात स्वतःला चिंब भिजवावं की...
नुसतंच मनाला रिझवावं
तुला गालावर ओघळू द्यावं की...
भाळावरतीच अडवावं
तुझ्यात मी हरवावं की...
तुला माझ्यात गुंतवावं
सरींना तुझ्या झेलावं की...
आडोश्याला मी शोधावं
तूच सांग अशावेळी
नक्की मी काय करावं...
तुला नयनात साठवावं की...
या नयनांनाही बरसावं

