Supriya Devkar

Romance


3  

Supriya Devkar

Romance


उपमा

उपमा

1 min 183 1 min 183

तिच्या नखशिखांत सौंदर्याची 

उपमा कोणास देवू

तिच्या भारावलेल्या नजरेत का

स्वतःस हरवून घेवू


तिचं खळखळत हासू होऊन 

पावसात मी न्हाऊन जाऊ

तिच्या कवेत शिरण्यासाठी

तिची निरागस मिठी होऊ


तिच्या सोबतचा आनंद घेन्या

ओठावरली लाली होऊ

सातजन्माची सोबत मिळण्या

आहुती माझी का मीच देऊ


तिचा अबोला नकोच मजला 

हवी तिची सदैव साथ

दिवस रात्रीचा प्रवास सारा

सुखदुःखांचा त्यात हात


उरल्या सुरल्या आयुष्याची

फुलवेन साथीने सदाफुली

आव्हानांना तोंड देताना 

होतील आशेची दालने खुली


Rate this content
Log in

More marathi poem from Supriya Devkar

Similar marathi poem from Romance