STORYMIRROR

Dr.GAURI NIRKHEE

Romance

3  

Dr.GAURI NIRKHEE

Romance

पाऊस

पाऊस

1 min
265

मेघ दाटले नभी तुझ्या सयींचा ठाव लागला

मनी मुसळधार पाऊस सरीवर सर कोसळत जाते

तुझ्या सयींची सर काळजावर कोरत जाते

ती पहिली भेट, तो पहिला पाऊस

ती बेभान नजर, तो वाफाळलेला चहा

त्या अव्यक्त भावना, त्या आश्वासक नजरा

तो गार वारा, अंगावरील शहारा

त्या प्रेमळ नजरा, साक्षीला निर्सग सारा

स्वप्नांची ती दुनिया, मोहाची ती माया

मंतरलेल्या क्षणांचा ठाव घ्याया

आज नभी मेघ दाटूनी आले

माझ्या मनीचा ठाव घ्याया!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance