माझी होशील का..?
माझी होशील का..?
डोळ्यांना लागले तुझ्याच भेटीची आस
खरं खरं सांग पुन्हा येशील का ??
शेवटच्या भेटीनंतर कोरड्या झालेल्या मनाला
पुन्हा एकदा प्रेमाचा ओलावा देशील का ?
तुझ्या सोबतची प्रेमारुपी वात विझून गेली
पुन्हा एकदा प्रेमाची ठिणगी टाकशील का ?
कान आसुसलेत तुझे बोल ऐकण्यासाठी
पुन्हा एकदा ते गोड बोल बोलशील का ?
स्वप्नांमध्ये रोज रोज येतेस अन् त्रास देतेस
पुन्हा एकदा प्रतक्ष्यात समोरी येशील का ?
तुला लिहायला घेतलेली पत्र, अजूनही कोरी पडलीत
पुन्हा एकदा त्यावर दोन शब्द लिहशील का ?
जुने मांडलेले डाव अजूनही अपुर्ण आहेत
पुन्हा एकदा येऊन ते पुर्ण करशील का ?
सामसूम रस्त्यावर एकट्याने चालू किती
पुन्हा एकदा तु सोबत चालण्यास येशील का ?
आणी पुरे झाले आता टोपण नावाने मिरवणे
कायमस्वरूपी उखाण्यातून नाव माझे घेशील का ??
-------------------------------
वाट पाहतोय त्या वाटेवर
पुन्हा येशील ना ?
बस झाली हि मर्यादांची जपणूक ,
एकदा मोकळं बोलूंन मार्ग काढशील ना...?
आता तर आठवणी सुद्धा प्रश्न पडलेत
विश्वासाचा बांध मजबुत करशील ना ?
प्रेमचा मार्ग उत्तम होता,
याची वाट लोकांना दावशील ना...?

