चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्या
साडेनऊच्या वाजते हास्याची घंटा
सगळे विसरून जातात, भांडण आणि तंटा
निलेश साबळे आहे मुख्य हेड
ज्यांन लावलंय सगळ्यांना वेड
भाऊ विसरतो पाठांतरातील वाक्य
कधीपण, कुठेपण, भाऊला विनोद शक्य
श्रेया बुगडे ही एकच नारी
दिसते सगळ्यात भारी
भारत गणेशपुरे चा नागपुरी कट्टा
सेट वर भरतो विनोदाचा सट्टा
अंकुर दिसतो छोटा
पण विनोद करतो मोठा
शेवट ची सूत्रे सगळी पोस्टमन काकांकडे
देऊ लागतात सत्य परिस्थितीचे धडे
पुर्ण टीम एकत्र राहू दे
विनोद पूर्ण जगात गाजू दे
विनोदाचा ध्यास नवा धरू या
चला हवा येऊ द्या...
