लग्नाचे साईड इफेक्ट
लग्नाचे साईड इफेक्ट
घेतले सप्तफेरे हात हातात घेऊनी
उचला विडा संकटाचा हसतमुख होऊनी
वेळेत घरी येऊ लागली आपोआप पावले
परकी झाली अाता ती कट्ट्यावरची पोरे
दर विकेंड असतो हट्ट मुव्ही अन हॉटेल चा
नाही म्हटल्यास आहे ४-५ दिवस अबोला
दिवस जातो अर्धा, काढण्यात रूसवा फुगवा
प्रेम आहे हे तरीही न आले मला पटवता
होऊन मिल्खा सिंग उचलतो एक रिंग मध्ये फोन
लव यु मीस यु बेबी असे रोज रोज म्हणेल कोण
क्रिकेट विसरून आता चालते सिरियल रोज
तरीही "I don't think it's working any more"
एक कपाटाच्या जागी आले तीन नवीन कपाट
तरीही आमच्या सौ चे कपडे का मावे ना त्यात
घरात रंगू लागल्या महिला मैफील अन किट्टी पार्टी
झाले माझे सगळे मित्र आता गुंडे अन मवाली
उबगलो मी कंटाळलो मी असे तरीही म्हणणार नाही
कारण माझ्या आजारपणात होते तिच माझी आई
जरी आली असली माझ्या स्वातंत्र्यावर गदा
तरी आहे तिच्या मुळेच घरपण माझ्या घराला