चांदण्या राती
चांदण्या राती


चांदण्या राती दिली प्रेमाची कबुली
तुझा हात माझ्या हातात घेऊनी
देईल मी तुला जन्मोजन्मी साथ
सुटणार नाही ही लग्न गाठ
थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने
देवदेवतांच्या साक्षीने
सप्तफेरे घेऊनी
सात पाऊले चालूनी
देते वचन तुजला
घेऊन माझी शपथ
सुख असो वा दुःख असो
सोडणार नाही पाठ
प्रेमाच्या या वेलीला
प्रेमाने खतपाणी देईन
संसाराचे हे चाक
तुझ्या बरोबरीने ओढेन
येतास कोणते संकट
आधी स्वतःवर घेईल
मृत्यू जरी सामने आला
तरी आधी मी सामोरे जाईल