घो मला असला हवा
घो मला असला हवा


फुल मागतास गुच्छ आणणारा
इशारा दिल्यास पटकन येणारा
शिंक येतास रूमाल आणणारा
घो मला असला हवा
तयार होतास छान म्हणणारा
जेवणाचे कौतुक करणारा
लोकांमध्ये स्तुती करणारा
घो मला असला हवा
दर विकेंड शॉपिंगला नेणारा
हॉटेल पार्टीला घेऊन जाणारा
महिन्यातून एकदा पिक्चर दाखवणारा
घो मला असला हवा
सकाळी उठून चहा बनवणारा
चहा सोबत न सांगता पोहे आणणारा
पाऊस पडताना भजे तळणारा
घो मला असला हवा
येताच मी रिमोट कंट्रोल देणारा
ATM पीन सांगणारा
शॉपिंग बॅग उचलणारा
घो मला असला हवा
मनातले न सांगताच करणारा
रूसताच मी मनवणारा
दिवसातून ३ वेळा प्रेमाची कबुली देणारा
घो मला असला हवा