STORYMIRROR

Pradeep Sahare

Comedy

3  

Pradeep Sahare

Comedy

गजरा

गजरा

1 min
196

संध्याकाळच्या वेळी,

म्हाया दोस्त राम्या,

बजारात मले भेट़ला .

थोड़ा जवळ येऊन,

बाजूला खेटला .

मी म्हटल राम्या,

"कुठ बे लेका संध्याकाळी,

तुया हातात ही हाय,

कश्याची पुडी ?''

तो थोडा दचकला,

तोंडातला मावा पचकला .

म्हने,

"काही नाही भाऊ,

आहे हा गज़रा ."

दोघांच्याही भीड़ल्या,

नजरेला नजरा .

मी म्हटल,

" लेका राम्या..!"

लगेच तो सावरला,

थोड़ासा बावरला .

एकदम दयायला,

लागला तो शीव्या..

" पश्चिम वाल्यान,

केल आमच्या संस्कृतिच,

लय मोठ वाटोल.

पायजम्यावरुन,

बरमुड्या वर आलो.

पोरी पन आता,

सलवार घालत नाही.

जीन्स घालुन फिरते,

म्हातारी बाई.

गजऱ्याच म्हनत भाऊ,

गजरा तीच्या रायला,

नेहमीच आवडीचा.

पन आमच्या तो चीवडीचा .

नाही रायल,

आम्हाला संस्कृतिच भान.

भाऊ आज आहे,

माया घरी,

"तीळसंक्रातच वान".

मी पन दचकलो,

लगेच तिथुन खचकलो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy